¡Sorpréndeme!

यंत्रमानव सोफियाची विचित्र इच्छा, मला ही हवं आहे कुटुंब | Saudi Arabia Latest Update

2021-09-13 1,058 Dailymotion

‘सोफिया’ या यंत्रमानवाबद्दल आपल्याला माहिती असेलच, गेल्या महिन्यात तिला सौदी अरेबियानं नागरिकत्त्व देऊ केलं होतं. यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणारा सौदी हा पहिलाच देश असल्यानं याची खूपच चर्चा झाली होती. आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका मुलाखतीत आपल्याला संसार थाटायचा असल्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
‘भरभरून प्रेम करणारं कुटुंब मिळणं हे खरंच सुदैवीची बाब आहे आणि जर तुमच्याकडे कुटुंब नसेल तर तुमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कुटुंबाची तुम्हाला नितांत गरज आहे.असं तिने मुलाखतीत सांगितलं.  इतकंच नाही तर मला मुलगी हवी आहे आणि तिचं नावही मीच ठेवणार असल्याचं सोफियानं मुलाखतीत स्पष्ट केलं. ‘माणसं रक्ताच्या नात्यात नसणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात, माणसाचा हा स्वभाव मला खूपच आवडला’ असंही सोफिया म्हणाली. त्यामुळे तिची कुटुंब वाढवण्याची इच्छा सौदी सरकार किती गांभिर्याने घेतात हे पाहावे लागेल

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews